यवतमाळ सामाजिक

स्व सुनिलभाऊ डिवरे यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ भव्य रक्त दान शिबिर संपन्न

हिवरी प्रतिनिधी
सुनिलभाऊ डिवरे यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ भव्य रक्त दान शिबिर संपन्न झाले,हे शिबिर एक तरुण वर्गाना संदेश देण्यासाठी प्रेरणा दायी ठरणार आहे आपण दिलेले रक्त अनेकांचे प्राण वाचविण्यााठी फलदायी ठरेल

  1.   22 डिसें.2022 ला ग्रामपंचायत कार्यालय भांब (राजा ) येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले स्व.सुनिलभाऊ डिवरे मित्रपरिवार व ग्रामस्थ यांनी या शिबिराचे आयोजन केले होते या मध्ये शेकडो तरुणांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्त दान केले या शिबिराचे उद्घाटन सरपंच मा.अनुप्रिता सुनील डिवरे,यांचे हस्ते करण्यात आले या वेळी उपसरपंच – दत्ता उद्देसिंग राठोड, सचिव – एच. व्ही. म्हातारमारे, सदस्य- . राजेश नारायण डिवरे, सुरेश रामदास बोद्रे, ऋषिकेश ठाकरे, सौ. जयश्री अमृत जगताप, सौ. ज्योती ज्ञानेश्वर लांजेवार सौ. मनीषा सचिन सोनवणे, सौ. रेखा अरुण काकडे, ग्रामपंचायत कर्मचारी व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright ©