यवतमाळ राजकीय

तिवसाळा ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीचे ‘ आमरण उपोषण ‘

 

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

गेल्या अनेक दिवसापासून
घाटंजी तालुक्यातील तिवसाळा ग्रामपंचायत येथे सरपंच व सचिव यांचा मनमानी कारभार सुरु आहे . गावात अनेक समस्या व ज्वलंत प्रश्न असून याबाबत ग्रामसभेत व मासिक सभेत चर्चा करण्यात येत नसून अनेक विकासकामे ठप्प पडलेली आहे . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहरीच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेतून न करता आपल्या मर्जीतील लोकांची नावे टाकून मंजुर करण्याच्या तयारीत आहे . असे केल्यास गरजू व पात्र शेतकरी या योजनेपासून वंचीत राहण्याची दाट शक्यता आहे . याच मुख्य मागणीला घेवून वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन भीमरावजी राठोडे आज दिनांक 21-12-2022 रोज बुधवारला आमरण उपोषणास बसले होते. तिवसाळा ग्रामपंचायत गट ग्रामपंचायत असून तिवसाळा व निबर्डा या गावात विविध प्रश्न प्रलंबित आहे . रस्त्याच्या बाजुच्या नाल्या तुंबलेल्या ,खताच्या ढिगाऱ्यासह जिकडे – तिकडे घानीचे साम्राज्य, रस्त्याच्या दोन्ही बाजुने अतिक्रमन वाढलेले आहे . अशा विविध समस्यने तिवसाळा हे गाव ग्रासलेले आहे.या संदर्भात सरपंच व सचिव यांना वारंवार सुचित करुनही ते या विधायक कामाकडे दुर्लक्ष करीत होते .म्हणून 21/12/2022 हे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.या आंदोलना मध्ये गावातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला व या आंदोलनाचा परिणाम तिवसाळा ग्रामपंचायत सचिव श्री. नरेश गुल्हाने यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन येणाऱ्या 27 तारखेला ग्राम सभेचे नेयोजन करून आंदोलना मधील संपूर्ण मागण्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले व आंदोलन करते नितीन राठोड यांनि गावकऱ्यांच्या संमतीने आंदोलना ला स्थगिती दिली . यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संघपाल कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे व नंदू राठोड , जगु भाई , रुपेश भाई , मनोज मुनेश्वर ,अनिल लोहकरे , खुशाल शेलुकार, विलास चव्हाण, अरुण चव्हाण , अनिल नाईक, गणेश नाईक ,विनोद नाईक , उमेश राठोड , गणेश राठोड , लखन जाधव , धनराज जाधव ,वासुदेव नाईक , इंदेल राठोड, संतोष चव्हाण, राकेश राठोड ,बाबूलाल महाराज व तिवसाळा गावातील असंख्य नागरीक उपस्थित होते .

Copyright ©