Breaking News यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथील कॉटन मार्केट समोरील पानटपरीवर अवैधरित्या देशी दारू विक्रेत्यावर धाड

 

नव्याने रुजु झालेल्या ठाणेदार बाविस्कर मॅडम ऍक्शन मोड वर

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी आज दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी मुखबीरकडुन खात्रीलायक खबर मिळाली की, ईसम नामे रूपेश अजाबराव पारटकर, वय ३४ वर्ष, रा. गजानन वार्ड, घाटंजी हा हा त्याचे मानोली रोडवरील कॉटन मार्केट समोरील पानठेल्यामध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत आहे, अशा खबरेप्रमाणे रेड केली असता ईसम नामे रूपेश अजाबराव पारटकर, वय ३४ वर्ष, रा. गजानन वार्ड, घाटंजी हा पांढ-या रंगाची मो. सा. क्र. एम. एच. २९ बि.वाय. ०५५९ अॅक्टीवाची डीकीमध्ये नायलोन थैलीमध्ये देशी दारूचे एकुण ४० पव्वे, प्रत्येकी ९० एम. एल. चे, प्रत्येकी ४० / रू. किंमतीचे असा एकुण १६००/ रू. तसेच मो. सा. क्र. एम. एच. २९ बि.वाय. ०५५९ अॅक्टीवा किंमत ९७,०००/रू. असा एकुण ९८६००/रू. चा मुद्देमाल अवैधरित्या मिळुन आला. गुन्हा क. ८६१ / २२ कलम ६५ ई महाराष्ट दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ, मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुषमा बाविस्कर मॅडम, पोहवा / १७०० वामन जाधव, पोना / १७५६ दिनेश जाधव, पोना/ २२६५ निलेश कुंभेकर यांनी केली.

Copyright ©