यवतमाळ शैक्षणिक

गृह उद्योग भेट- शैक्षणिक सहलीचे आयोजन!

प्रतिनिधी
स्थानिक स्व.राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने गृह-उद्योग भेट या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्याचे प्रमाण वाढविण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले. सदर सहलीमध्ये पवणार येथील विनोबा भावे आश्रम येथे भेट देण्यात आली. विद्यार्थिनींनी तेथील ग्रंथालय,अनेक वर्षांपूर्वीच्या दगडाच्या कोरीव आणि आकर्षक अशा विविध मूर्तींचे परीक्षण केले. त्याचप्रमाणे सेवाग्राम येथील बापूकुटी ला भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न. या शैक्षणिक सहलीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. ए.पिस्तूलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सहलीमध्ये एकूण 24 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या सहलीकरिता प्रा.डॉ. चोरडिया, प्रा स्वाती मनवर, श्रीकांत वानखेडे,प्रा. डॉ.मनीषा क्षीरसागर आणि गृह अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©