यवतमाळ सामाजिक

न.प. च्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे जनसामान्यात आनंद वेक्त

 

मुख्य रस्ते मोकळे झाल्याने अपघाताला बसणार आळा

प्रतिनिधी प्रवीण बोरकर

यवतमाळ नगर परिषदेच्या वतिने शहरातील रस्त्यांची हद्द गिळकृत करणारी जाहिरात फलके व अतिक्रमणे तथा अनाधिकृत कच्चे व पक्के बांधकाम हटविण्यात येत असुन आज सलग चौथ्या दिवशी मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे दारव्हा नाका ते लोहारा पाॅइंट या मार्गावरचे सर्व अतिक्रमण हटविण्यात आले.
या रस्ता हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन व्यावसायिकांनी अनेक छोटेमोठे व्यवसाय थाटले होते. ही बाब अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होती. शहरातुन जाणारा व अकोला- अमरावती या दोन्ही प्रमुख शहरांना जोडणारा हा वर्दळ पुर्ण असा रस्ता आहे. या मार्गावर गाड्यांचे शोरुम बियर बार, मंगल कार्यालये, मोठमोठाली रेस्टॉरंट्स असुन रस्त्यालगतच्या वसाहतींनी व्याप्त असा हा परिसर आहे. अनाधिकृत व्यवसाय चालकांनी शहरातील मुख्य रस्त्यांची साइड पार्कींगची गिळंकृत केलेली जागा अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे मोकळी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या मोहिमेंतर्गत आतापर्यंत शहरातील बसस्थानक, नेताजी मार्केट,दत्त चौक, आर्णी रोड ते वनवासी मारोती मंदिर, दारव्हा नाका ते लोहारा पाॅइंट, ते वाघापुर परिसरातील ५०० वर अतिक्रमणे काढण्यात आली. शहरात ही कार्यवाही सुरू असतांना सौम्य विरोध वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. हे विशेष.
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांचे मार्गदर्शनात बांधकाम नगर अभियंता विनय देशमुख, प्रियंका फुकटे,गजानन वातीले,बाजार अधिक्षक मिलींद घुले, विद्युत अभियंता अमोल रामटेके आ.नि.राहुल पळसकर, प्रफुल्ल जनबंधु,क्षेत्रीय विभागप्रमुख सहदेव पाली,संजय साठे, बंडु कुमरे,ज्योतीराम इंगोले,आशिष लंगोटे, संजय हरणखेडे, गिरीश गिरटकर, व विवीध विभागीय कर्मचाऱ्यांनी ही कार्यवाही यशस्वी केली.

Copyright ©