यवतमाळ शैक्षणिक

स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य सुशिलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय येथे पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य सुशिलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय येथे पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

स्थानिक स्व. राजकमलजी भारती कला वाणिज्य,आणि विज्ञान महाविद्यालय व सुशिलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गृह अर्थशास्त्र विभागाच्या बी.ए भाग एक, दोन, तीन या तिन्ही वर्गाच्या विद्यार्थिनीं उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी विविध रंगाची फुले,पाने, आकर्षक पुष्पपात्र, आणि विविध कलात्मक वस्तूंचा वापर करून आकर्षक अशा पुष्परचना बनविल्या. पुष्परचना कार्यशाळेचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. ए. पिस्तुलकर सर यांनी भूषविले. त्यांनी पुष्परचना कार्यशाळेचे महत्व,कार्य व भावी उद्योजक घडविण्यासाठी ही कार्यशाळा किती उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तर या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस.व्ही. वानखेडे सर उपस्थित होते. सरांनी विद्यार्थींना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरित केले. आपल्यामधील विविध कलागुणांचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे अशी उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.भाग एक ची विद्यार्थिनी कु. पायल उईके हिने केले तर आभार प्रदर्शन कु. छकुली राठोड हिने केले. या कार्यक्रमाला एकूण 60 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रा डॉ.क्षीरसागर आणि गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©