यवतमाळ सामाजिक

राज्यात तात्काळ ‘लव जिहाद विरोधी अन,’धर्मांतरण बंदी कायदा’ लागू करा ! – दत्त चौक येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांची राष्ट्रीय हिंदुआंदोलनातून मागणी !

राज्यात तात्काळ ‘लव जिहाद विरोधी अन,’धर्मांतरण बंदी कायदा’ लागू करा ! –
दत्त चौक येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांची राष्ट्रीय हिंदुआंदोलनातून मागणी !

यवतमाळ- मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विराधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणानंतर काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथेही 19 वर्षीय ‘निधी गुप्ता’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सुफीयान नावाच्या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना समोर आली, या केवळ एक-दोन घटना नसून अशी अनेक उदाहरणं यापुर्वीही समोर आलेली आहेत. असे अनेक ‘आफताब व सूफियान’ उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध, क्रूर आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला व सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद अर्थांत् ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणी 15 डिसेंबरला दत्त चौक, यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठांनी हिंदूराष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे केली.
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’,अन ‘धर्मांतरण विरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, योग वेदांत समिती, राष्ट्रसंत विचार मंच, हिंदू महासभा,
सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती यासह धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी ‘आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !’,‘लव्ह जिहादी नराधम आफताब पूनावाला ला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणाही देण्याआल्या.

Copyright ©