यवतमाळ सामाजिक

18 डिसेंबर रोजी मुकूटबन येथे प्रभु पार्श्‍वनाथ भगवान जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन

18 डिसेंबर रोजी मुकूटबन येथे प्रभु पार्श्‍वनाथ भगवान जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन

यवतमाळ – श्रमण संघीय उपप्रवर्तक परमपुज्य अक्षय ऋषीजी म.सा. सेवाभावी नवदिक्षीत परमपुज्य गितार्थ ऋषीजी म.सा. यांच्या सानिध्यामध्ये दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मुकूटबन येथील श्री वर्धमान श्वेतांबर स्थानक जैन श्रावक संघच्या वतीने प्रभु पार्श्‍वनाथ जन्मकल्याणक महोत्सव व तसेच विदर्भस्तरीय स्वाध्याय संघ व भारतीय जैन संघटना जैन श्रावक संघ स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन सेवा समितीचे अध्यक्ष रमेश खिवसरा स्वाध्याय सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष अमरचंद गुगलिया, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप मुनोत, जेष्ठ स्वाध्यायी निर्मल छाजेड, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ. संजिवरेड्डी बोदकुरवार, शिवसेना प्रवक्ता किशोर तिवारी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील जैन श्रावक संघाचे सर्व अध्यक्ष या स्नेह संमेलनाकरीता आवर्जून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे संयोजक विजयकुमार बुंदेला हे असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र गेलडा हे करणार आहे. सकाळी 6.30 ते 7.15 उवसग्गह जाप, 8.30 ते 9.30 जन्मकल्याणक जुलूस, 9.30 ध्वजारोहण, 9.30 ते 10.30 प्रवचन, 10.30 ते 11.30 स्नेह संमेलनाचे प्रथम सत्र दुपारी 1 ते 2.30 स्नेह संमेलनाचे द्वितीय सत्र याप्रमाणो भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील सर्वात छोटे संघ असलेले मुकूटबन येथे आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा याप्रसंगी जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विजय कोठारे, उपाध्यक्ष महेंद्र आबड, सचिव सुरेंद्र तातेड, कोषाध्यक्ष नरेंद्र कोठारी, संपर्क सुत्र राजेश तातेड यांनी केले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©