यवतमाळ सामाजिक

श्रमिक इमारत कामगार अध्यक्ष महेश ठाकरे यांच्याकडे कामगारांनी मांडल्या आपल्या व्यथा

 

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी:महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने कामगारांची नोंदणी करून विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती तथा विवाह साठी मदत केल्या जाते, कामगारांची आरोग्य तपासणी, घरकुल ,साहित्य वाटप ,विविध आजार व अपघात ग्रस्त कामगारांना आथिर्क मदत अश्या अनेक योजना कामगारांना शासनाकडून मिळतो.परंतु घाटंजी येथील खापरी गावातील कामगारांना ग्रामसेवक कामगार अर्जवर सहा देत नसल्याने तथा सहा साठी अनेक कागदपत्रे मागत असल्याने कामगार त्रस्त झाले आहे.त्यामुळे वरील सर्व लाभापासून वंचित राहत आहे कामगारांना मदत करण्याचे सोडून कामगारांना लाभापासून वंचित ठेवल्या जात आहे. कामगार अध्यक्ष महेश ठाकरे यांच्या कडे ता.घाटंजी येथील खापरी गावातील कामगारांनी सर्व व्यथा मांडली .त्यावेळी त्यांनी सदर बाब कामगार मत्री तथा पालक मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी यांच्या कडे मांडून कामगारांना न्याय मिळूवन देण्याच्या शब्द दिला यावेळी महिला तारा नरसेकर ,बेबी सुयंवशि ,गजानन ठाकरे , विलास गायकवाड ,नितीन देठे, सचिन ढोरे,मंगेश शिलार,विठल सोनुरले, विनोद गेडाम, राहुल मुंडे उपस्थित होते.

Copyright ©