यवतमाळ सामाजिक

संभाजी ब्रिगेड यवतमाळ च्या तालुका कार्याध्यक्षपदी माननीय विकासभाऊ उत्तमराव लसंते

 

संभाजी ब्रिगेड यवतमाळ च्या तालुका कार्याध्यक्षपदी माननीय विकासभाऊ उत्तमराव लसंते यांची निवड करण्यात आली
आदिवासी गोंड गवारी आरक्षण यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते विकास भाऊ लसंते हे गेल्या वीस वर्षापासून समाजकार्यात सक्रिय आहेत बरेचसे आंदोलन त्यांनी त्यांच्या मार्फत केले आहे गाव खेड्यातील दुःखी अपरिचित व्यक्तींचे कामे करणे हा त्यांचा एकमेव उद्देश पण नुसतच समाजकार्य करायचे असेल तर राजकीय पाठबळ लागते यासाठी महाराष्ट्रात धगधगत्या तरुणांची मर्द मावळ्यांची एकमेव संघटन म्हणजे संभाजी ब्रिगेड पक्षात येऊन त्यांनी तालुका कार्याध्यक्ष यवतमाळ या पदाकरिता त्यांची निवड करण्यात आली सर्व तालुक्यातील लोकांमध्ये या निवडीबद्दल मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली तसेच त्याबरोबर सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते

Copyright ©