यवतमाळ सामाजिक

वनपाल यांचे कार्यालय बनले विश्रामगृह

 

वनपाल यांच्या कृत्यामुळे संबंधित नागरिकांमध्ये रोष

बोरी अरब प्रतिनिधी- आशिष सावंकार

ता दारव्हा अंतर्गत
वनपरिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक दारव्हा या ठिकाणी कार्यरत असलेले दारव्हा बीटचे वनपाल मागील काही महिन्यापासून कार्यरत झाल्यापासून सतत वादग्रस्त म्हणून त्यांचा परिचय झालेला आहे. त्यांच्या वर्तणुकीबद्दल वन विभागाच्या परिसरात आणि संबंधित नागरिकांमध्ये चांगलाच रोष असल्याचे दिसून येत आहे त्यांनी शासकीय नियम धाब्यावर बसून शासकीय नियमाची ऐसी तैसी करून कार्यालयाला चक्क विश्रामगृह बनविण्याचा प्रकार नुकताच काहीसा चर्चेत आला आहे

दारव्हा उपविभागामध्ये दारव्हा बीट साठी वर्णी लागावी म्हणून मोठमोठ्या फिल्डिंग लावून राजकीय बळाचा वापर करून अधिकाऱ्यांना खुश करून दारव्हा बीट मिळविण्यासाठी अनेक वेळा लॉबिंग झाल्याची चर्चा परिसरामध्ये ऐकावयास मिळत आहे परंतु मागच्या वर्षी रुजू झालेले दारव्हा बीट चे वनपाल हे रुजू झाल्यापासूनच वनविभागाच्या विकासात्मक कामाला ब्रेक लागला आहे वनपाल यांना शासकीय कामकाज जमत नसल्यामुळे किंवा त्यांना कामकाजाची फारशी माहिती नसल्यामुळे ते आपल्या कार्यालयामध्ये येऊन झोपा काढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे बिना कामाचा पगार वन विभागाकडून त्यांना मिळतो आहे हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल परंतु ही कुठलीही कहानी नसून सत्य परिस्थिती आहे दारव्हा बीटचे वनपाल यांनी स्वतःच्या कार्यालयालाच विश्रामगृह बनविल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी सुद्धा त्या कार्यालयात जाऊन पाहत नाही 24 तास बंद हे कार्यालय असते त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या जनतेला आणि नागरिकाला आल्या पदरी निराशा घेऊन परतावे लागत आहे त्या कारणाने वनपालाचे कार्य वनपालांची जबाबदारी वनपालांचे कर्तव्य या सगळ्या बाबीला हरताळ फासून हम करे सो कायदा या मनीप्रमाणे दारव्हा येथील वनपाल वागत असल्याची चर्चा परिसरामध्ये ऐकावयास मिळत आहे तो कार्यालयात झोपा काढतो याचा सबळ पुरावा सुद्धा एका तक्रारकर्त्याने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या तक्रारीतून सांगितले असताना सुद्धा या मस्तवाल निगरगट्ट वनपालावर वनविभागाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने वनविभाग अशा काम चुकार वनपालला अभय तर देत नाही ना असा प्रश्न सुद्धा उपस्थित केल्या जात आहे. एवढेच नव्हे तर काही दिवसाआधी शेलोडी मुंडळ (टेकडी) येथे झालेल्या मुरूम उत्खलना संदर्भात अद्यापही कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नसून किंवा कागदावरचेच घोडे नाचविल्या जात असल्याचे तक्रार करते. सामाजिक कार्यकर्ता अवधूत गुघाने यांनी सुद्धा याआधी तक्रार दिली.. त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्याची चर्चा सुद्धा परिसरात आहे.
त्यामुळे मुख्य वनस्वारक्षक आणि उपवनसंरक्षक यवतमाळ यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनपालाची चौकशी करावी आणि शासकीय कार्यालयात झोपा काढणाऱ्या या मस्तवाल वनपालाला निलंबित करण्याची मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

Copyright ©