यवतमाळ राजकीय

घाटंजीत चंपा ला जोडे मारुन निषेध आंदोलन

 

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

सध्या स्तिथीत महाराष्ट्र भुमित जन्म घेणाऱ्या तथा सर्व जनमानसांचा उद्धार करणाऱ्या छत्रपति शिवाजि महाराज महात्मा ज्योतीबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील, यांचे महान कार्याची महारा ष्ट्र राज्याचे तज्ञ शिक्षण मंत्री चद्रकांत पाटील ,व राज्यपाल भगतसींग कोश्यारी यांनी अवहेलना केली.छत्रपती शिवाजी महाराज, ‘कर्मवीर भाऊराव पाटील व महात्मा जोतिबा फुले,भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील मानसांच्या शिक्षण व हक्का साठी अख्ये जिवन खर्ची घातले. त्या कार्याबद्दल बोलतांना चंपा यांनी भिक मागुन शाळा चालविल्या असे चुकीचे
उद्दगार काढले ज्यानी शिक्षण प्रक्रियेसाठी कधीही कार्य केलेले नाही ,शैक्षणीक कार्य शुन्य व मंत्री पदाची गर्मी असणाऱ्या चंद्रकांत पाटलांचे अर्थहिन उद्दगार
म्हणजें सुर्याला तळहाताने झाकण्यासारखे आहे. याचा जाहीर निषेध करण्यासाठी
शिवरायांच्या समतेच्या न्यायप्रक्रीयेला, महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचाराशी,कर्मवीर भाउराव पाटिल यांना माननारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला माननाऱ्या सर्व पक्षीय तथा लोकशाही तत्वाला अनुसरून लढणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने शहीद स्मारक चौक, घाटंजी येथे दिनांक 13/12/2022 रोजी मंगळवार ला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संघपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निकोडे, नितीन राठोड, निलेश कडू,मनोज मुनेश्वर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे अध्यक्ष मनोज ढगले,अभिनव वाडगुरे यवतमाळ, प्रशांत मस्के,अभिजित निमकर,काँग्रेस पक्षाचे विजय कडू,अनंत चौधरी, माणिक मेश्राम, सुभाष गोडे,सागर डंभारे,अरविंद चौधरी, संजय गोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले, बंडू तोडसाम,कृष्णा पेंडंपवार, शिंपी समाज संघटणेकडून चंद्रशेखर नोमुलवार, संजय दीकुंडवार,सचिन कर्नेवार महाराष्ट्र माळी मिशनचे दिनेश गाऊत्रें,शंकर लेनगुरे व शेकडो सर्व पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Copyright ©