यवतमाळ राजकीय

बाळासाहेब शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी प्रविण निमोदिया यांची निवड

 

यवतमाळ ः बाळासाहेबांची शिवसेनाचे पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेवरुन पक्ष सचिव संजय मोरे यांनी पक्षाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी नुकतीच घोषित केली. त्यामध्ये शिवसेना व्यापारी आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख प्रविण रमेशचंद्रजी निमोदिया यांची बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती केली आहे.
प्रविण रमेशचंद्रजी निमोदिया हे टिंबर मर्चंड असोसिएशनचे सचिव व नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष तसेच श्यामबाबा भक्त मंडळाचे जेष्ठ सदस्य असून अग्रवाल समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आपला सहभाग नोंदवतात. 2014 पासून त्यांनी शिवसेनेमध्ये सक्रीय भूमिका पार पाडली म्हणूनच त्यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. प्रविण निमोदिया यांनी रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर या मध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले असून शहरातील विविध सामाजिक संघटना व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे ते महाविर इंटरनॅशनल या संस्थेचे सुद्धा अध्यक्ष आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, खा. भावनाताई गवळी, युवा नेते पराग पिंगळे यांना देतात.

Copyright ©