यवतमाळ सामाजिक

एड्स विषयक जनजागृती व मार्गदर्शन

एड्स विषयक जनजागृती व मार्गदर्शन

संजीवनी निवासी मतिमंद शाळा, पांढरकवडा रोड यवतमाळ येथे दिशा केंद्र आणि सुरक्षा क्लिनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ आणि संजीवनी निवासी मतीमंद पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 डिसेंबर ला जागतिक मतीमंद दिन तसेच 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या सप्ताहानिमीत्य विद्यार्थींना आणि शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारींना एड्स विषयक जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. मतीमंदाना सहानुभूतीची नाही तर सहकार्य आणि प्रोत्साहनाची गरज या विषयावर मार्गदर्शन आणि मॅजीक शो चे आयोजन यावेही करण्यात आले होते. यावेळी डाॅ.शिरभाते मतीमंदाचे सुप्त गुणांना पुढे आणून प्रोत्साहन आणि मदत देण्याीच इच्छा व्यक्त केली. दिशा केंद्राच्या समुपदेशक सारीका सिदगूर यांनी एड्स या विषयावर तसेच चाईल्ड लाइनचे दिलीप दाभाडेकर यांनी मतीमंद मुलांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर एचआयव्ही तपासणी शिबीराकरीता अमिता मोहनापूरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच गुप्तरोग समुपदेशक राजेश्वर चकोले यांनी मदत केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेच्या डॉ.असमा काझी, डॉ.एस.के.काझी, मुख्याध्यापिका फरीदा पठाण यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमानंतर विद्याथ्र्यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शाळेहचे वसंत चव्हाण, बबन सोयाम, संदीप श्रीरामे, किशोर भगत, अमोल चव्हाण, सुनिल सोनवणे, शरद श्रीरामे, असीफ खान, सुशिला चव्हाण, ज्योत्स्ना नगराळे,सिध्दीकी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©