यवतमाळ सामाजिक

किर्तन महोत्सव उद्घाटन सोहळा दिव्‍यमय वातावरणात संपन्न

सतकार्यात सहीग घेणे म्हणजे ईश्वरीय कार्य : पु. आई अंबिका माता
दृकश्राव्य अभंग नृत्य अविस्मरणीय सादरीकरण : श्रोतेवृंद मंत्रमुग्ध
किर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ द्वारा आयोजित भव्‍य किर्तन महोत्सव दि. १० ते १७ डिसेंबर दरम्यान संपन्न होत आहे.
यवताळकरांना भुषणावह असणाऱ्या किर्तन महोत्सवाचे हे ९५ वे वर्ष. स्थानिक शिवाजी नगर प्रांगणात संपन्न होणाऱ्या या किर्तन पर्वाचे उदघाटन बोपापूर वासी पूजनीय आई अंबिका मातेच्या पावन शुभहस्ते संपन्न झाले. नऊविधा मुलींमध्ये कलीयुगात श्रावणभक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती असून अशा प्रकारच्या सतकार्यात सहभाग घेणे म्हणजे ईश्वरीय कार्य, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या आशीर्वादपर वक्तव्‍यात केले. याप्रसंगी आयोजित समितीचे अध्यक्ष सुरेश कैपील्यवार, उपाध्यक्ष डॉ. विजयराव पोटे, अरविंद तायडे, सचिव अरुण भिसे, सहसचिव डॉ. सुशील बत्तलवार, विशेष अतिथी गणपतराव कासारे व्‍यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी अरुंधती भीसे यांनी गीत सुमनांनी अतिथींचे स्वागत केले. पु. अंबिका आईचा सन्मान श्री. व सौ. कैपील्यवार यांनी केला, तसेच मान्यवर अतिथींचे स्वात अशोक सिंघानिया, मोहन भुजाडे, आशीष भिसे, दिलीप मादेशवार यांनी केले. प्रास्ताविक अरुणजी भीसे यांनी केले. भरतबुवा रामदासी यांच्या प्रेरणेतून रुजविलेल्या या किर्तन महोत्सव रुपी रोपट्याचे एका विशाल वृक्षांमध्ये झालेले परिवर्तन हे निष्ठेचे फळ आहे. असे भावपूर्ण उदगार त्यांनी व्‍यक्त केले. ईश्वरीय शक्तीची अनुभूमी मी अनेकदा अनुभवली असे वक्तव्‍य कैपिल्यवार यानी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले. सुशील बत्तलवार यांनी आभार व्‍यक्त केले.
आजच्या सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे नृत्यांगणा सुचना बांगाले यांची स्वनिर्मित भारतनाट्यम तथा शास्त्रिय नृत्याचा अविष्कार असलेले अभंग नृत्य सादरीकरण. सतीश पगडे, साक्षी गायधने, वैदेही बनसोड, रुचिता भीसे नागपूर यांच्या साथीने गणेश स्तवन, नटराज पूजन ते नाथ परंपरे पासून वारकरी सांप्रदायापर्यंत दिंडी, गजरांच्या अभंगावर अप्रतिम नृत्य सादर करुन श्रोतृवृंदाच्या दृष्टिचे पारणे आणि विशेष म्हणजे हे सर्व सविनय सादर करुन श्रोत्यांची वाहवा मिळविली.

Copyright ©