यवतमाळ राजकीय

100 कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

100 कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश

आज कमळजाई संस्थान मोझर येथे शिवसेनेचा बोरी, लाडखेड, महागांव या जि. प. गटाचा शिवसैनिक मेळावा पार पडला. यावेळी प्रमोदजी सोनवणे संपर्कप्रमुख यवतमाळ विधानसभा, जिल्हाप्रमुख संतोषभाऊ ढवळे, माजी मंत्री संजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत रवीभाऊ गझलवार व युवासेना तालुकाप्रमुख विकास गझलवार यांच्या मार्गदर्शनाखाली 100 कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेण्यात आला. यावेळी संतोषभाऊ ढवळे वे संजयभाऊ देशमुख यांनी बोरी, लाडखेड,महागांव जि.प. व या अंतर्गत येणाऱ्या 6 पंचायत समितींवर भगवा शिवसेनेचा भगवा फडकवू तसेच संजय राठोड नावाचा जीन बादलीत बंद करून परत कळंब तालुक्यात पाठवून देऊ तसेच गद्दार भावना गवळी ला येत्या 2024 मध्ये धडा शिकऊ असे आश्वासन दिले. यावेळी यवतमाळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रमोदजी सोनवणे, जिल्हाप्रमुख संतोषभाऊ ढवळे, माजी मंत्री संजयभाऊ राठोड, कल्पनाताई दरवई जिल्हा संघटिका,पुष्पाताई जयस्वार महिला आघाडी ,उपजिल्हाप्रमुख गजाननभाऊ डोमाळे, संजयभाऊ रंगे अजयभाऊ गाडगे तालुकाप्रमुख, गिरीजानणंद कळंबे युवासेना उपजिल्हाप्रमुख, विकास गझलवार युवासेना तालुकाप्रमुख आदी आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,महिला आघाडी उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना तालुका प्रमुख विकास गझलवार,रवि गझलवार,विभाग प्रमुख ओंकार राऊत देवानंद राठोड,आशिष सावंकार, ओमशीव राठोड, जितेंद्र दुधे, संतोष रावेकर, खुशाल जाधव, प्रदीप बावणे, किरण बागोकार, विनोद नेमाने तालुका संघटक यांनी केलें.

Copyright ©