यवतमाळ सामाजिक

सरोदे ए आय एम ए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्ड नी सन्मानित

सरोदे ए आय एम ए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्ड नी सन्मानित

27नोव्हेंबर रविवार रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे राष्ट्रीय पातळीवरचा ॲक्युपंक्चर स्टार अवॉर्ड 2022 हा ठेवण्यात आला
होता. या अवॉर्डला भारतातून अनेक राज्यातुन ॲक्युपंक्चरिस्ट आले होते. जास्त करून महाराष्ट्र मधील संख्या जास्त होती. नुसतीच महाराष्ट्र ॲक्युपंक्चर कौन्सिलची स्थापना होऊन हजारो लोकांना रजिस्ट्रेशन देण्यात आले. अश्या ॲक्युपंक्चर प्रचारक काही महाराष्ट्रमधील लोकांना व महाराष्ट्र बाहेर जे ॲक्युपंक्चरचा प्रचार प्रसार करतात अश्या लोकांना हा अवॉर्ड देण्यात आला.

या अवॉर्डला देशातील सर्वात भव्य ॲक्युपंक्चर अवॉर्ड मानल्या जात आहे. या कार्यक्रमला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा श्री डॉ भागवत कराड साहेब, डॉ रजनीश कांत,
यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती.
अश्या या भव्य कार्यक्रमात संगीता सरोदे यांना अवॉर्ड देण्यात आला.या अवॉर्ड बद्दल सर्व ठिकाणावरून मित्र परिवार कडून शुभेच्छाची वर्षाव होत आहे.

Copyright ©