Breaking News यवतमाळ सामाजिक

*पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन*

 

मराठी वाड्.मय क्षेत्रातील, नव्या जुन्या-कसदार कवितेच्या गौरवार्थ, सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, सुजाण साहित्य रसिक , लोकप्रिय मराठी अध्यापक व माजी जि. प. सदस्य श्री. नरेशचंद्र रामटेके यांनी, आपल्या दिवंगत पत्नी च्या स्मृती प्रित्यर्थ, वाड्.मय पुरस्कार दरवर्षी देण्याचे ठरविले आहे, दिवंगत सौ. लता ताई रामटेके स्मृती-या नावाचा हा प्रथम वर्ष पुरस्कार, १जानेवारी २०२२ ते ३०नोव्हेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या मराठी काव्य संग्रहाला देण्यात येईल. यासाठी वरील कालावधीत प्रकाशित काव्य संग्रह कवींनी, दि. २० डिसेंबर २०२२ पूर्वी वा पर्यंत, प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे, समन्वयक, दिवंगत सौ. लता रामटेके पुरस्कार समिती, ०९,जागर, आदर्श नगर, जांब रोड, वडगाव, यवतमाळ जि यवतमाळ – या पत्त्यावर पाठवावे. काव्य संग्रह दोन प्रती, दोन छायाचित्रे आणि अल्प परिचय सोबत काव्य संग्रह 31 डिसेंबर 2022 पर्यन्त पाठवावे.. या करीता रुपये ५०००/- रोख, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून तो, येत्या दि. २९ जानेवारी २०२३ रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या विशेष समारंभात प्रदान केल्या जाईल. पुरस्कार विजेत्या कविंना येण्या जाण्याचा खर्च दिल्या जाईल. परीक्षकांना निर्णय अंतिम असेल. तेव्हा अधिकाधिक कवींनी या पुरस्कारासाठी आपले काव्य संग्रह पाठवावे, असे आवाहन पुरस्कार समिती चे अध्यक्ष व सुप्रसिद्ध साहित्यिक विनय मिरासे’अशांत’ यांनी केले आहे.

Copyright ©