यवतमाळ राजकीय

*बिगर 7/12 शेतकरी संघटनेचा 12 डिसेंबरला टेभी नाका ते मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी आक्रोश मोर्चा*

 

यवतमाळ ः बिगर 7/12 शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा येत्या 12 डिसेंबर रोजी टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या समाधीला अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तशी सुचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत एका निवेदनातून देण्यात आली आहे. भारत सरकारचा सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी तसेच ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, संजय राठोड, दादा भुसे यांच्या पुढाकाराने संघटनेच्या वतीने दाखल केलेल्या निवेदनाची दखल घेऊन बहुतांश ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला सदर अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करण्यासाठी शासन निर्णयात उपविभागीय स्तरावर शक्ती प्रदत्त समिती गठीत करुन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सचिव यांच्या मार्फत गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन सदर प्रस्ताव नियमानुकूल करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्या जातो. सदर प्रक्रिया तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात सुरु झाल्यामुळे गावातील बेघर लोकांनी गावठाण भुखंडावर निवासासाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल होऊन प्रधानमंत्री आवास योजना सहित घर खालील जागेचा मालकी हक्क मिळाला त्याच धर्तीवर विद्यमान शिंदे – फडणवीस सरकारने सर्वांसाठी शेती 2024 धोरणाची घोषणा करुन बहुतांश ग्रामीण दलित आदिवासी, कोलाम, फासे पारधी, गोंड, परधान, बंजारा, वडार, गवारी व भुमिहीन ओ. बी. सी. व गरीब मराठा समाजाच्या लोकांनी महसुल व वनविभागाच्या पडीत जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे. तत्कालीन मंत्री मंडळाने सर्वांसाठी घरे 2022 धोरण घोषित करुन निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करुन बहुतांश निवासी अतिक्रमणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी होऊ घातलेल्या नागपूर अधिवेशनात धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा या मागणीसाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन आहे.
धर्मविर आनंद दिघे यांच्या ठाणे येथील समाधी स्थळावर अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर हा महा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. या पूर्वी 24 ऑगस्टला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही. वाशिम – यवतमाळ मतदार संघाच्या खा. भावना गवळी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून या प्रश्‍नाबाबत विनंती केली असतांना खा. गवळी यांनी या दलीत आदिवासींच्या प्रश्‍नावर अक्षम्य दुर्लय केल्यामुळे नाईलाज म्हणून टेंभी नाका ते ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थाना पर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती केंद्रीय कार्यध्यक्ष भाई जगदिशकुमार इंगळे, प्रदेश अध्यक्ष नंदु पाटील काठोळे, कार्य अध्यक्ष गजानन वानखडे, सदस्य गणेश राऊत, हंसराज पुनवटकर, रमेश आत्राम, भास्कर आत्राम, रविंद्र ढुमणे, शांता मोडणकर, फासे पारधी समाजाचे नेते तुंगया पवार आदिंनी दिली आहे.

Copyright ©