यवतमाळ सामाजिक

*श्री संताजी महाराज जयंती उत्सव महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या वतीने साजरा*

 

यवतमाळ ः महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तसेच श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ चे वतीने श्री संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथे दिनांक 8/12/2022 रोजी श्री संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला प्रांतिक चे विलासराव गिरोलकर व सौ. रुपाली ताई गीरोलकर यांचे हस्ते अभिषेक करण्यात येऊन प्रांतिक जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे, संताजी शिक्षण मंडळा चे अध्यक्ष शैलेश गुल्हाणे विवाह मंडळ चे अध्यक्ष महेश ढोले, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर, शिवसेना नेते संतोष ढवळे, पोलीस निरीक्षक मनोज केदारे, प्राचार्य वाधवानी कला महाविद्यालय जयंत चतुर, सौ. सुमन ताई साकरकर यांनी महाराजांचे पूजन करून अभिवादन केले याप्रसंगी सुरेश काका जिरापुर, सोपानजी गुल्हान, प्रमोदजी अजमिर, सुरेश अजमिरे, रमेश जयसिंगपुरे, संतोष डोमाळे, विजय बिजुलकर, प्रभाकर शिरभाते, सुनील गुलवाडे, चेतन भुराने, विजय तायडे प्रांतिक चे सर्व पदाधिकारी व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संताजी स्पोर्ट्स तर्फे सौ. मनिषताई आखरे यांनी मुलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रांतिक जिल्हा शाखा तर्फे यवतमाळ शहरात ठीक ठिकाणी संताजी महाराजांचे फलक लाऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बाभुळगाव राळेगाव नेर येथे प्रांतिक तर्फे मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

Copyright ©