यवतमाळ सामाजिक

*काश्यपी ने दिली आपुलकीने मायेची ऊब*

 

यवतमाळ:- येथील सनराई इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये इयत्ता सहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या कु. काश्यपी विनोद दोंदल नामक मुलीने लहान मुलामुलींना वाटले आपल्या जवळील उबदार कपडे,
शहरात बाहेर राज्यातून तसेच बाहेर गावावरून रोजनदारी करीता वास्तव्याला आलेल्या, उघड्यावर संसार थाटून रोजनदारी करणाऱ्या व्यक्तीच्या थंडीत कुडकूडनाऱ्या छोट्या लहान मुलामुलींना आपल्या जवळील स्वेटर, जॅकेट, कानटोपी व मफरल असे थंडीत शरीराला गर्मी देणारे उबदार कपडे देण्यात आले, हे हिवाळ्यातील उबदार कपडे वाटप करताना काश्यपीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
आपल्या

आपल्या कडे असलेले जुने पण घालण्यायोग्य कपडे व वापरणीत येणारे इतर साहित्य आम्हाला आणून द्यावे किंवा मोबाईल नंबर वर फोन करून माहिती द्यावी, आम्ही येऊन घेऊन जाऊ असे आवाहन नारी रक्षा समिती व संकल्प फाऊंडेशनचे विनोद दोंदल यांनी केले. 8806600688

Copyright ©