महाराष्ट्र सामाजिक

*श्रीदत्तशिखर संस्थानच्या बहुतांश विश्वस्तांची कर्तव्याप्रती प्रतारणा.*

माहुर ( प्रतिनिधी )सुरेखा तळणकर

श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त श्री दत्तात्रेय स्वामी यांचे दर्शन व प.पू.प.म.मधुसूदनजी भारती महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी राज्यासह तेलंगणा,आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील दत्तभक्तांनी दि.७ डिसें. रोजी मोठी गर्दी केली होती.यावेळी मंदिर व्यवस्थापन समिती व प्रशासनाने केलेले नियोजन समाधानकारक होते.परंतु धार्मिक विधीसह यात्रा नियोजनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या बहुतांश अशासकीय विश्वस्तांनी संस्थानवर येणे टाळल्याने त्यांच्या कर्तव्यावर व श्रद्धेवर प्रश्न चिन्ह उभा झाला आहे.
दत्तशिखर संस्थानचे अध्यक्ष म्हणून प.पू.प.म. मधुसूदनजी भारती महाराज, सचिव म्हणून डॉ. गणेश तुकाराम पाटील,कोषाध्यक्ष म्हणून ॲड.निलेश नरसिंगराव पावडे, विश्वस्त म्हणून आशिष पंजाबराव देशमुख,अण्णासाहेब त्र्यंबकराव देशमुख, विश्वासराव जांबुवंतराव माने हे व्यवस्थापन सांभाळत आहेत. दत्तजयंती हा संस्थानचा सर्वात मोठा उत्सव आहे.येणाऱ्या लाखो भाविकांना मिळणाऱ्या सुख, सुविधा व धार्मिक विधी नियोजनात कुठलीही उणीव राहू नये ही खबरदारी घेण्याची जबाबदारी अशासकीय विश्वस्त मंडळास उचलावी लागते. ते त्यांचे आद्य कर्तव्यच असते.श्री रेणुकादेवी संस्थानचे सर्वच अशासकीय विश्वस्त यात्रा काळातच नव्हे तर दररोज ती जबाबदारी निष्ठेने व श्रध्देने पार पाडतात.तीच अपेक्षा दत्त शिखर संस्थानच्या विश्वस्ताकडून असते.परंतु सचिव वगळता अन्य पदाधिकारी व विश्वस्तांनी दत्त जयंती उत्सवाला नेहमी प्रमाणे दांडी मारल्याने त्यांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह उभा स्वाभाविकच आहे.

Copyright ©