यवतमाळ सामाजिक

*मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण* *मुबारक तवर*

 

 

सावळी सदोबा परिसरातील
विविध मागन्या मान्य न झाल्यास
20 डिसेंबर पासून आमरण उपोषण
जि.प.ऊपाध्यक्ष मुबारक तंवर यांचा इशारा.

सावळी सदोबा : आशिफ खान
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा व परिसरातील सततच्या विद्युत लपंडावाने जनता त्रस्त झाली असून तसेच विद्युतचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाळून चालली आहे तेव्हा पूर्ण दाबाने व कायमस्वरूपी विद्युत पुरवठा व्हावा , संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचे विविध कारणांमुळे बंद करण्यात आलेले अनुदान पूर्ववत सुरू करावे , कापेश्वर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वानुकिडीने (गोगलगायीने ) खाऊन फस्त‌ केल्याने जवळपास पंधरा शेतकऱ्यांची शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली असून त्यांना शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी , आयता येथील गॅस सिलेंडर च्या स्फोटाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबांला शासनाने आर्थिक मदत करावी, या वर्षीच्या सततच्या पावसाने व पुराने अनेक घरांची पडझड झाली त्या घरांचे पंचनामे झाले परंतु त्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही तेव्हा ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी तसेच पांदण रस्ते मंजूर करावे अशा विविध मागण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी २० डिसेंबर 2022 मंगळवारपासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मा. जिल्हाधिकारी , मा.अधीक्षक अभियंता विद्युत मंडळ यवतमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , आर्णी तहसीलदार , आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनातून दिलेला आहे

Copyright ©