यवतमाळ सामाजिक

*चिकणी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

 

यवतमाळ :- महापरिनिर्वाण दिन व श्री दत्त जयंती च्या औचित्यावर जनहित युवा बहुउद्देशीय संस्था चिकणी यांचे विद्यमाने दिनांक 6 डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा चिकणी येथील प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. रक्तसंकलनासाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी होती. जिल्ह्यातील रक्ताची वाढती मागणी आणि पडणारा तुटवडा पाहता रक्तदाते वाढवणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन महापरिनिर्वाण दिन तथा दत्तजयंती निमित्त शिबीर आयोजन केले होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील आडे, रक्तमित्र प्रफुल भोयर, ऋषिकेश टाटर, सुरेश राठोड, राम जाधव, सचिन राठोड, सागर वलके,आशुतोष पाढेन, अजय चव्हाण, दत्ता गजरे, कुणाल राठोड, संचित कुत्तरमारे, लेखन राठोड, करण ठाकरे, यांनी मेहनत घेतली.

Copyright ©