यवतमाळ सामाजिक

शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे खेळाडूची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

शोतोकान कराटे डो असोसिएशन,
यवतमाळचे खेळाडूची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक 05 ते 06 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये शोतोकान कराटे डो असोसिएशन, यवतमाळचे विद्यार्थी 17 वर्षे वयोगटात श्रवण निकेश कडूकार, पियुष नितीन राठोड व 19 वर्षे वयोगटात यश कृषभ दर्वेकर या खेळाडूंनी आपले उत्कृष्ट प्रदर्शन दाखवुन प्रथम क्रमांक प्राप्त केले. व होणाऱ्या विभागीय कराटे क्रीड़ा स्पर्धेत आपले नाव नोंदवले आहे. तसेच चंदन ज्ञानेश्वर राऊत, समर्थ चंद्रशेखर चौधरी, शौर्य शैलेश मोरे, सार्थक प्रविण कमळे, आदर्श प्रदीप जाधव, ओम राहुल कडूकार, कौशल नंदकिशोर येन्नरवार, कु. आदिश्री मोहन तेलंग,कु. अदिबा मोबिन चव्हाण, कु. गौरी विनोद खोडकुंबे या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेतील असुन हे विद्यार्थी शंकरलाल कोठारी विद्यामंदिर समर्थवाडी यवतमाळ येथे प्रशिक्षण घेतात. या खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक श्री. रोहित केवारकर, श्री. अजित मिश्रा,श्री. हेमंत उईके व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थियांचा कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), श्रीमती नंदा जी. खुरपुडे(जिल्हा क्रीडा अधिकारी यवतमाळ),ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े, विनोद खोडकुंबे, अश्विनी उईके, रविन्द्र महानुर व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©