यवतमाळ सामाजिक

नवदिनचा पुढाकार : दिव्‍यांग फॅशन शो तील विजेत्यांना पुरस्कार वितरन

नवदिनचा पुढाकार : दिव्‍यांग फॅशन शो तील विजेत्यांना पुरस्कार वितरन

यवतमाळ : नवदिन एज्यूकेशनने पुढाकार घेत यवतमाळ शहरात दिव्‍यांग दिनानिमित्त प्रथमच दिव्‍यांगासाठी ४ डिसेंबर फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी फॅशन शो स्पर्धेत शेकडो दिव्‍यांगांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक श्रेणी अ- प्रथम वंश त्रिवेदी, द्वितीय झोया अन्सारी, श्रेणी ब – 1ली – सर्वेश महाजन, 2रा – नोमान खान, श्रेणी क, पहिली – अनिक पठाण, दुसरी – रिद्धिमा राठोड, विशेष उल्लेख – भावना सिंघानिया, , सुवर्णपदक – तनिशा शर्मा, रौप्य पदक-समर्थिका उरकुडे, कांस्य पदक – राजवी देशमुख आणि देवांश गुग्घे , सुवर्णपदक – रोहन आमनेकर, रौप्य पदक – भावना सिंघानिया, कांस्य पदक – मयूर राऊत आणि सोहम दुद्धलवार यांना प्रोत्साहनपर सुवर्णपदक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट डिझायनर पुरस्कार – नूरिन फातेमा आणि समीरा अहमद व सर्व मुलांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले, उद्घाटन सोहळा कोमल भोयर, आयोजक जफर भाई, असद आणि तस्नीम बॉम्बेवाला…जे नवदीन एज्युकेशन स्कूल व थेरपी सेंटर चे ओनर आहे, कॅडेन्स अकादमी सदर शाखा नागपूर संघाचे डिझायनर जेबा अली। , प्ले थेरपी यवतमाळ अडोलसेंट अकेडमी डॉ. रतनपारखी आणि टीम यांनी घेतले
दिव्‍यांगासाठी फॅशन शो यवतमाळ शहरातील एमएच २९ मॉल एसबीआय चौक येथे आयोजित केला होता. यावेळी प्रमुख अतिथी मिसेस ब्युटीफुल मॉस्ट पॉप्युलर २०१८ डॉ. निकिता चव्‍हाण, मिस्टर विदर्भ मोस्ट पॉप्युलर २०१९ विक्रांत कोटक हे उपस्थित होते. तसेच नवदीन एज्युकेशनचे अध्यक्ष जफरभाई बॉम्बेवाला, सचिव असदभाई बॉम्बेवाला, प्रोजेक्टर डायरेक्टर तसनीम बॉम्बेवाला,उपस्थित होते. या फॅशन शोमध्ये नागपूर, वर्धा, आर्वी, दारव्‍हा, यवतमाळ, अमरावती, अकोला येथून दिव्‍यांग स्पर्धक सहभाग नोंदविला. स्पर्धकांचे कपड्यांचे डिझाईन केडन्स ॲकेडमी नागपूरचे संचालक झेबा असद अली यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
त्यांच्या आयुष्यात ‘नवदिन’चा प्रकाश
नवदिन एज्यूकेशन सोसायटी द्वारे याआधीही दिव्‍यांगासाठी विशेष स्पर्धा राबविल्या आहे. यात २०१७ मध्ये दिव्‍यांगासाठी क्रीडा स्पर्धा, २०१८ मध्ये नृत्य व गायन, २०१९ मध्ये स्टेट लेवल योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरवर्षी दिव्‍यांगासाठी मॅरेथॉन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबवून दिव्‍यांगाच्या कलात्मक गुणाला वाव देण्यात नवदीन एज्युकेशनचा मोलाचा वाटा आहे.

Copyright ©