यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*घाटंजी येथील नगर परिषद शाळा क्र. 2 घाटी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा*

 

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी:नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2 घाटी- घाटंजी येथे घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री न्यामुमियाॅ देशमुख काका यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण पडलवार सर हे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये वर्ग आठवीचा विद्यार्थी सौरव गणेश भोंगरे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु. वेणूताई मेश्राम, कु. वृषाली अवचित, सोनूताई पेटेवार, श्री. संजय गोलर, श्री. कृष्णा मडावी, श्री. वसंत सिडाम, श्री. तुषार बोबडे, श्री. नरेंद्र राठोड तसेच सेवक श्री. नारायण डहाके व कांचनताई मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. वसंत सिडाम यांनी केले.

Copyright ©