यवतमाळ सामाजिक

*वारजई येथे जागतिक मृदा दिन व क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न*

 

प्रतिनिधी प्रवीण बोरकर

वारजई येथे 5 डिसेंबर 2022 रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र सावंगी व कृषी विभाग दारव्हा तर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ प्रतीक्षा ताई शेंडे सरपंच यांनी भूषविले प्रमुख पाहुणे शेखर थोरात तालुका कृषी अधिकारी दारव्हा तसेच अक्षय इंजाळकर शास्त्रज्ञ केवीके सावंगी, राहुल इंगोले शास्त्रज्ञ केवीके सावंगी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे चे शास्त्रज्ञ श्री राहुल इंगोले यांनी जागतिक मृदा दिनाप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याबाबत जागरूक केले.
तालुका कृषी अधिकारी, शेखर थोरात यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविकात कृषी विभागाच्या निरनिराळ्या योजनांची माहिती देऊन महाडीबीटी या योजनेची सखोल अशी माहिती दिली.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेचे शास्त्रज्ञ अक्षय इंजाळकर यांनी हरभरा व गहू पिकांच्या लागवडी बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी, शरद सोळंके यांच्या मार्गदर्शनात प्रल्हाद बोईनवाड कृषी सहाय्यक मारुती महानर, कृषी सहाय्यक निलेश ओळंबे कृषी सहाय्यक व किशोर महल्ले तांत्रिक सहाय्यक, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष श्रम घेतले.
यावेळी गड्डे साहेब इफको प्रतिनिधी, रामनाथ खडके, मनोज खडके, सुभाष कव्हाणे, राम पारधी,सौ. गायत्री राठोड, राजकुमार डहाणे, नरेंद्र उमाटे संतोष खाकरे संतोष शेंडे गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©