Breaking News महाराष्ट्र सामाजिक

३ *हजार किमीचा सायकल प्रवास करुन वर्ल्ड रेकॉर्ड महापरिर्वाण दिनी अभिवादन करुन होणार प्रवास सुरू, १० दिवसांत पुर्ण करणार तीन हजारांचा टप्पा*

माँ तुझे सलाम…

यवतमाळ, प्रतिनिधी :
आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. देशाचे स्वातंत्र्य व अखंडता आबाधीत राखण्याकरीता भारतीय सेनेच्या जवानांचे शौर्य व बलिदानाचे यामध्ये फार मोठे योगदान आहे , या सर्व भारतीय जवानांना मानवंदना देण्याकरीता म्हणुन हि विजय यात्रा. प्रदूषण मुक्त पर्यावरण व तंदरुस्त आणि निरोगी शरीर असे अनेक संदेश या माध्यमातून पोहचविण्याचा उद्देश घेऊन दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 7.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला अभिवादन करून ही चमू यवतमाळ येथुन श्रीनगर ला रवाना होत आहे.
जगाच्या इतिहासात भारत देशाचे नाव लौकिक करायला निघालेल्या चमुला प्रेम रुपी आशीर्वाद , शुभेच्छा देण्याकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ “FLAG OF ” करिता उपस्थित राहावे व त्यांचा उत्साह द्विगुणित करावा. असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळचे माजी मंत्री, आमदार मदान येरावर ( यवतमाळ विधानसभा),, दि. यवतमाळ अर्बन को-ऑप बँक ली, यवतमाळ, दि. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि, नांदेड यांचे सौजन्याने क्रीडाभारती सायकलिंग ग्रुप, यवतमाळ चे सदस्य डॉ. महेश मनवर, डॉ. आशीष गवरशेट्टीवार , डॅा अतुल माईंदे, डॅा. हर्षल झोपाटे, डॅा. सौ जया मनवर, अभिजीत राऊत, . सुरेश भुसांगे अशी 7 RIDERS ची चमू “काश्मीर ते कन्याकुमारी ” असा 3660 किमी चा प्रवास सायकलिंग द्वारा 10 दिवसात पूर्ण करण्याकरिता दि. 8 डिसेंबर 2022 रोजी श्रीनगर येथून सुरुवात करणार आहे. ” GUINNESS WORLD RECORD” हा जागतिक विक्रम प्रस्थापीत करण्याकरिता WUCA यांचेकडे नोंदणी करण्यात आली आहे.

Copyright ©