यवतमाळ सामाजिक

निवडणूक प्रक्रीयेत दाखल केलेला दस्तऐवज पळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी

निवडणूक प्रक्रीयेत दाखल केलेला दस्तऐवज पळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी.

 तक्रार कर्त्याची मागणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या मुळे गुन्हे दाखल करा 

ग्राम पंचायत धानोरा ( सा . ) येथील ग्राम पंचायतीच्या निवडणूकीकरीता तहसिल कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यासमक्ष सादर केलेल्या नामनिर्देशनपत्राच्या संचातील जात पडताळणी पावती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संबंधिता विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी धानोरा (सा.) येथील संतोष शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे .
धानोरा (सा . ) येथील ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने दि . 2 डिसेंबर रोजी नामनिदेशन पत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी वार्ड क्र 3 मध्ये ना . मा प्रवर्ग साठी मधुकर रंधे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस . माने यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर तेथे अचानक आलेल्या राहुल माधव काळे या गावातीलच व्यक्तीने रंधे यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्र दस्तऐवजातील जात पडताळणी पावती फाडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचे विरुद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष रंधे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे .

चौकट :
सदर घटना घडली आहे . सहाय्यक निवडणूक अधिकारी तलाठी चंद्रवशी यांचे समक्ष संबंधिताकडून पळवून नेलेला कागद परत केला त्यामुळे त्याचे विरुद्ध कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही . घटनेच्या वेळी मी तेथे नव्हतो .
पी एस माने
निवडणूक निर्णय अधिकारी ग्रा पं. निवडणूक

Copyright ©