यवतमाळ सामाजिक

माहूर शहरात कार्यालय थाटलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी दिली तंबी.

माहूर प्रतिनिधी सुरेखा तळणकर

माहूर शहरात कार्यालय थाटलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी दिली तंबी.

मुख्यालयी वास्तव्यास न राहता माहूर शहरात कार्यालये थाटून कारभार करीत असलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपला सज्जा व मंडळाच्या ठिकाणी राहून सर्वसामान्य नागरिकांची कामे करावीत, त्यासाठी त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये, असे लिखित आदेश तहसिलदार किशोर यादव यांनी दि.२५ नोव्हेंबर रोजी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
माहूर शहरात काही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपली कार्यालये उभारली आहेत.त्यामुळे त्यांचे स्तरावरील थोडेही काम पडल्यास दुर्गम भागात व खेड्यापाड्यात वास्तव्यास असलेल्या सर्व सामान्य नागरिकांना माहूर शहरात धाव घ्यावी लागत आहे.त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार मनसेचे तालुकाध्यक्ष राजू पवार यांनी दि.२१ नोव्हेंबर रोजी दिली होती. त्याला अनुसरून तहसिलदार किशोर यादव यांनी वरील आदेश काढला आहे.त्या आदेशाची वास्तवात अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Copyright ©