यवतमाळ सामाजिक

शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना हिवाळ्यात घ्या सापांनपासून विशेष काळजी.

शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना हिवाळ्यात घ्या सापांनपासून विशेष काळजी.

आर्णी रोडवरील मनदेव जवळ असलेल्या कास्तकार टर्निग पॉइंट हॉटेल च्या मागे मंगेश माहुरे याच्या शेतामध्ये शेतीला पाणी देण्याच्या पिंकर च्या पाईप मधे एक साप असल्याची माहिती त्यांनी अर्जुना बीट चे वनरक्षक विवेक पांडे यांना देण्यात आली.
त्यांनी ती माहिती MH29 हेल्पींग हॅण्ड च्या हेल्पलाईन नंबर वर दिली.
माहिती टिम ला प्राप्त होताच टीमचे हिवरी मनदेव येथील वन्यजीव रक्षक जीवन तडसे यांनी घटनास्थली पोहचून पाहणी केली असता एक विषारी जातीचा नाग पींकर च्या पाईप मधे जाऊन बसला होता.
सापाला व्यवस्थित रेस्कु करून जमलेल्या जमलेल्या नागरिकांना सपाबद्दल माहिती देण्यात आली.
आणि हीवरी फॉरेस्ट ऑफिसला नोंद करून मनपुर वनरक्षक दांडगे मॅडम यांच्या मार्गर्शनाखाली सापाला निसर्गमुक्त करण्यात आले.

शेतकरी मित्रांनो शेतात काम करत असताना थोडी विशेष काळजी घ्या, शेतीला पाणी देण्याचे पाईप बदलवत असतांना काळजी पूर्वक बदला. थंडी असल्याने साप हे थोडे गरम ठिकाणे शोधतांना बंद असलेल्या शेतीत पडलेल्या पाईप मधे जाऊन बसतात.
नकळत आपण त्याचा जवळ जाऊन तो आपल्याला चावा घेऊ शकतो.
अशी घ्यावी काळजी
सर्पदंश टाळण्यासाठीअंधाराच्या ठिकाणी टॉर्चचा वापर करावा, घराच्या बाहेर असलेल्या कोरड्या जागेत ठेवलेले सामान काढताना खातरजमा करुनच सामानाला हात लावावा, साप दिसला तर अंतर ठेवा, घरा जवळील परिसर स्वच्छ ठेवावा, सापाला उगाच मारण्याचा प्रयत्न करू नका, साप दिसता सर्प मित्राला संपर्क करा, विटा व दगडाचे ढिगारे, पालापाचोळा साफ करताना विशेष काळजी घ्यावी, पाळीव प्राणी, पक्षी सुरक्षित जागी ठेवावेत. शेतात, घराबाहेर जमिनीवर झोपू नये.
वन्यजीव धोक्यात दिसताच वाचवण्यासाठी MH 29 हेलपींग हॅण्ड संस्था यवतमाळ (मो. नं: 9850577616) यांच्याशी संपर्क करू शकता.किंवा वनविभाग हॅलो फॉरेस्ट (1926) वर कॉल करा.
अशे संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष नीलेश मेश्राम यांनी सांगितले.

Copyright ©