यवतमाळ सामाजिक

जोडमोहा येथे पाणीपुरवठा योजनेचा थाटात उद्घाटन समारंभ संपन्न

जोडमोहा येथे पाणीपुरवठा योजनेचा थाटात उद्घाटन समारंभ संपन्न

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत जोड मोहा येथे तब्बल दोन कोटी रुपयाचे पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हे होते तर यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या अनौपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटन राळेगाव मतदार संघाचे आमदार अशोकरावजी उईके यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षाचा पाणी प्रश्न प्रलंबित असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना झळ सोसावी लागत होती हि महत्व पूर्ण समस्या सोडविण्यासाठी आमदार अशोकराव उईके यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली लागण्याने समस्त नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले येथील जल जीवन मिशन ग्रास्थाना नवं संजीवनी देणारी योजना ठरणार असल्याचे आ. उईकें यांनी आपले मत वेक्त केले ग्रामपंचायत या प्रसंगी जोडमोहा सरपंच सुनंदा मुरकुटे, उपसरंच मारूती गायकवाड, माजी  जि प उपाध्यक्ष शामभाऊ जयस्वाल, माजी सभपती प स कळंब विलास भाऊ राठोड, सदस्य कल्पना बंधाटे, कवडू चौधरी, पवन जाधव, विनायक मैस्कार गावातील प्रतष्ठित नागरिक किसन भोयर, संतोष ठाकरे, अशोक कासार, नारायण ढाकुलकर, हरिभाऊ बंधाटे, नानाभाऊ धानफुले माजी सरपंच डहारे, माजी उपसपंच प्रभाकर पडघान, जीवन आत्राम, सनी राठोड, प्रशांत भोयर नरेंद्र राठोड जोडामोहा गाव गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले

Copyright ©