यवतमाळ सामाजिक

*10 डिसेंबर पासून यवतमाळात भव्य कीर्तन महोत्सव भूमिपूजन संपन्न*

 

यवतमाळ ः शहरात कीर्तन महोत्सवाची भव्य परंपरा सुरु असून दरवर्षी नामवंत कीर्तनकार सहभाग घेऊन सेवा देत असतात. 2 वर्षे कोरोना लाटेमुळे होऊ न शकलेला कीर्तन महोत्सव दि. 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत येथील शिवाजी नगर मैदानात संपन्न होत आहे.

श्री सुक्त पठन

या वर्षी दि. 11 डिसेंबरला रविवारी सकाळी 8 ते 9 वाजे पर्यंत ह. भ. प. वर्षा दामले व निखील डगावकर यांच्या मार्गदर्शनात कुंकू मार्जन व श्री सुक्त पठनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कीर्तन महोत्सवात शनिवारी दि. 10 डिसेंबरला, बोपापूर वासी, महंत अंबिका भारती व अ. भा. वैष्णव चतुसंप्रदायाचे अध्यक्ष महंत संगीत कृष्ण सावरिया महाराज यांचे हस्ते सायंकाळी वाजता कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन होईल.
2005 पासून सुरु असलेल्या गौरवशाली परंपरेनुसार पूर्वी अवधुतवाडी आखाडा प्रांगणात महोत्सव होत असे. पहिल्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन शिव शाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले होते. आतपर्यंत 150 च्यावर कीर्तनकारांनी यवतमाळकरांना सेवा दिली आहे तर शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य गुरुदास महाराज, पुज्य जितेंद्रनाथ महाराज ब्रह्मलिन महंत रामलखनदास यांचे सानिध्य व आशिर्वाद लाभले आहे.
यावर्षी दि. 10 डिसेंबरला सुत्रना बंगाले नागपूर, दि. 11 डिसेंबर ला सौ. सायली मुळे रत्नागिरी दि. 12 डिसेंबरला श्रीपाद अभ्यंकर चिंचवड पुणे, दि. 13 डिसेंबरला सौ. राधिका कालेकर कोल्हापुर यांचे भारुड. दि. 14 डिसेंबरला किरण तुळपुळे गोवा व दि. 15 डिसेंबरला निहाल खांबाटे व दि. 17 डिसेंबरला समारोपीय कीर्तन यवतमाळचे सदानंद देशपांडे करतील. तर पुणे येथील गंगाधर देव स्वर मंजुषा व नागपूर चे श्रीधर कोरडे तबल्याची साथ देतील.
भूमिपूजन संपन्न
आज शुक्रवारी सकाळी शिवाजी मैदानात भूमिपूजन व धर्मध्वजारोहण महोत्सव समितीचे सुरेश कैपिल्यवार यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री पांडे गुरुजी यांनी पौराहित्य केले. या प्रसंगी सचिव अरुण भिसे, उपाध्यक्ष अरविंद तायडे, डॉ. सुशील बत्तलवार, मोहनराव भुजाडे, सतीश राठोड, रवि ढगे, दिलीप मादेशवार, आशिष भिसे, केतन मजेठिया, बंसीलाल छत्तानी, देविदास गोपलानी, चंद्रकांत गड्डमवार, पांडूरंग झिजुर्डे, वर्षाताई दामले, ठाकुर बुधलानी, आशिष भिसे, केतन मजेठिया, सौ. गोरेताई, सौ. कैपिल्यवार, सौ. अरुंधती भिसे, राजेंद्र डांगे, संतोष डोमाळे, देवा राऊत, प्रभाकर होरे, सतीश सारडा, अमर दिनकर, अमोल ढोणे, लक्ष्मणलाल खत्री, विजय बुंदेला आदि उपस्थित होते.
जास्तीत जास्त यवतमाळकरांनी कीर्तन महोत्सवात श्रवण लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेश कैपिल्यवार यांनी केले.

Copyright ©