यवतमाळ सामाजिक

‘कौटुंबिक वादामुळे मुलांवर होणारा परिणाम’ या विषयावर पथनाटयाचे आयोज

‘कौटुंबिक वादामुळे मुलांवर होणारा परिणाम’ या विषयावर पथनाटयाचे आयोज

कौटुंबिक न्यायालय यवतमाळ, जिल्हा वकील संघ, यवतमाळ व महात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य विद्यालय , यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कौटुंबिक वादामुळे मुलांवर होणारा परिणाम या विषयावर कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात ‘पथनाट्य’ आयोजित करण्यात आले होते. या पथनाटयामध्ये पती- पत्नीच्या कलहामुळे लहान मुलांवर दुष्परिणाम होउन ती टोकाची पाऊले उचलू शकतात अशा प्रकारचा संदेश देण्यात आलेला आहे. सदर पथनाटय आयोजित करण्याची कल्पना कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मा. सुभाष रं.काफरे साहेब यांनी मांडली होती. कौटुंबिक न्यायालयात नेहमीच पती पत्नीच्या कलहाचे प्रकरणे पाहावयास मिळतात परंतु त्या कलहाचा दुष्परीणाम लहान मुलांवर कसा व कश्या प्रकारे होतो या बाबत सर्वांनमध्येच जनजागृती यावी व कलह पर्यायाने त्याचे मुलांवरील दुष्परिणाम टाळणे किती गरजेचे आहे याचे महत्व विषद करणारे हे पथनाटय होते.

सदर पथनाटयाच्या वेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री सुभाष रं. काफरे यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्री अमीत बदनोरे हे प्रामुख्याने हजर होते. सदर पथनाट्यामध्ये महात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सिध्दार्थ गंगाळे व पथनाट्य सादरीकरण अश्विनी तांबे, रिणा खोडे, स्वाती भगत, साईमा शेख, अविनाश घाटे, गौरव भगत, प्राची परगणे, वैष्णवी मेश्राम, सोनल बनसोड, अंशुल मेश्राम, राहुल तलमले, पुजा भुजाडे ईत्यादी विद्यार्थी यांनी केले. त्यांचे यावेळी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवुन कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री प्रमोद फाळके यांनी केले. या प्रसंगी यवतमाळ जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. आशिष तोटे, सदस्य अॅड. सुमीत कांबळे, अॅड. संजय जाऊळकर , अॅड. संदिप चिद्दरवार, अॅड. जयसिंग चव्हाण, अॅड. प्रदिप पांडे, अॅड. प्राची निलावार, अॅड. छाया मुळे, अॅड. नासीर खिलजी व वकील संघाचे सदस्य, कौटुंबिक न्यायालय, यवतमाळचे विवाह समुपदेशक ज्योती माटे, सहाय्यक अधिक्षक नारायण जाधव, लघुलेखक प्रमोद फाळके, वरिष्ठ लिपीक मो. शकील मो. हनीफ, कार्तीक दळवी, मनिष गंपावार, सचिन पांगारकर, शुभम फरतोडे, दत्ता जाधव, अनिता सोनटक्के न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©