यवतमाळ सामाजिक

जय जवान जय किसान सहकारी कारखाना शेतकऱ्यांची बैठकीचे आयोजन

जय जवान जय किसान सहकारी कारखाना शेतकऱ्यांची बैठकीचे आयोजन

भुमिपत्राचा जय किसान सहकारी साखर कारखाना मुंगसाजी नगर बोदेगाव हा शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांच्या पुढाकारातून चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या कारखान्याला सुरू करण्यासंदर्भात पुढील दिशा काय असावी हे ठरवण्यासाठी एकत्रित येण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला कारखाना परिसरातील व कारखान्याशी संबंधित सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जय किसान सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद स्थितीत आहे. या कारखान्यामुळे या भागातल्या अनेक तरुणांना रोजगार देऊ शकतो, या कारखान्यात मुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळाला तर या भागातील आर्थिक जीवनमान उंचावणारे असणार आहे. ज्यावेळी हा कारखाना सुरू होता त्यावेळी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला व या भागातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन मिळाले. काही कारणास्तव हा साखर कारखाना बंद पडलेला आहे मात्र यामुळे आपल्या भागातला विकास थांबला व शेतकऱ्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी जीवनदायी असलेला भूमिपुत्रांच्या जय किसान सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी या भागातल्या काही शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. आपली प्रगती कारखाना सुरू झाल्याशिवाय होणार नाही, ही गोष्ट आता शेतकऱ्यांना पटलेली आहे. कारखाना जर सुरू झाला तर आपल्या भागात असलेल्या पाण्यामुळे उसाचे क्षेत्र वाढू शकते व सध्या ऊस हा सर्वात जास्त फायदेशीर व नगदी पीक आहे. त्यामुळे कारखाना जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत या भागातल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या सहकार्याने व काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या प्रमुख लोकांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा जय किसान सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेले आहेत. याबाबत विचार विनिमय करण्यासाठी ४ डिसेंबर रोजी जागृत हुडीचा मारुती माणकोपरा येथे सर्व शेतकरी बांधवांची पुढील दिशा ठरवण्यासाठी एक व्यापक बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीला या भागातील शेतकरी व ऊस उत्पादक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©