यवतमाळ सामाजिक

निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ द्वारा आयोजित सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्नांकरीता तपासणी शिबीर व मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद.

निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ द्वारा आयोजित सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्नांकरीता तपासणी शिबीर व मार्गदर्शन मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद.

बळीराजा चेतना भवन , जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे निस्वार्थ सेवा फाऊंडेशन अंतर्गत , थॅलेसेमिया व सिकलसेल रुग्णांकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. जिल्हाधिकारी अमोलजी येडगे सर , प्रमुख मार्गदर्शक डॉ. विंकी रुगवाणी सर ( राष्ट्रीय अध्यक्ष अखील भारतीय थॅलेसेमिया सिकलसेल संघटना) तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. फुलपाटील सर अधिष्ठाता व.ना.शा.रु. यवतमाळ हे उपस्थित होते. तसेच डॉ. केशवानी सर , डॉ. अभिजित गावंडे सर, डॉ. कावलकर सर , प्रा. घनश्याम दरणे सर,सुरेश भाऊ राठीजी, आणि सिकलसेल थॅलेसिमिया ग्रस्त रुग्ण व त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सूर्वात झाली,सदर शिबिरा मध्ये डॉ. रुगवानी यांनी अनेक रूग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचार सुचविले. तसेच सर्व रुग्णाला तीन तास मार्गदर्शन केले. डॉ. रुगवानी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक रुग्णांना झाल्यामुळे सर्वच रुग्णांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. त्या करीता अनेक पालकांनी डॉ. रुगवानी सरांचे खुप खुप आभार व्यक्त केले.

Copyright ©