Breaking News यवतमाळ सामाजिक

*ग्रामीण महिलांना मिळणार रोजगाराच्या संधी ब्युटी क्विन्स ग्रुपतर्फे आर्णी येथे दोन दिवसीय सेमीनार संपन्न*

 

मिस इंडिया फॅशन आयकॉन अंजली गवार्ले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
यवतमाळ : आर्णी येथे दिनांक २६ आणि २७ नोव्‍हेंबर रोजी दोन दिवसीय सेमीनारचे आयोजन महालक्ष्मी लॉन येथे करण्यात आले. सेमीनारच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रीयन ब्राईडल लूक, वेस्टर्न ब्राईडन लूक, आणि साऊथ इंडियन ब्राईडन लूकचे प्रशिक्षण देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी ब्राईडन कॉम्प्टेशन घेण्यात आले. त्यामध्ये बऱ्याच युवतींनी आपला सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातील होतकरू मुलींना रोजगार आणि रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उददेशाने आर्णी शहरात प्रथमच लूक ॲण्ड लर्न सेमीनाराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्ष ण म्हणून मिस इंडिया फॅशन आयकॉन २०२२ तसेच प्राईड ऑफ वुमन डॉ. सौ. अंजली गवार्ले प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर याप्रसंगी फॅशन कोरीयोग्राफर विशाल डहाळे, अलका कोथळे, बीएमएव्‍हीएम यवतमाळ जिल्हाध्यक्ष शितल राजेश लाड, डॉ. सविता कुचरे, माजी जि. प. सदस्या पुजा बाळासाहेब मुनगिनवार, मेकअप आर्टीस्ट उषा कांबळे याप्रसंगी उपस्थित होते. परिक्षकांनी निवड केल्ेल्या स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात प्रथम क्रमांकाचे पुरस्कार २००१ रुपये मृणल ठमके यांनी तर द्वितीय क्रमांक पैठणी शालू साडी बरखा जयस्वाल तर तृतीय ५०१ रुपये रोख बक्षिस प्रणाली देठे यांनी पटकविले. त्यांना विजयी क्राउन, सन्मान ट्रॉफी, सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्युटी क्वीन ग्रुपचे सौ. प्रिती भोयर, सौ. मिताली घुले, उषा कांबळे दारव्‍हा, यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मृणालीनी दहीकर यांनी तर आभार मिताली घुले यांनी मानले. कार्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून हिरो होंडा आर्णीचे संचालक अभिषेक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ब्युटी क्वीन्स ग्रुप ऑफ यवतमाळ यांनी पहिल्यांदाच राबविलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व्‍यक्त केल्या जात आहे.

Copyright ©