यवतमाळ सामाजिक

आचरे तयाचा धर्म या वैचारिक संग्रहास प्रथम साहित्य पुरस्कार.

 माहूर प्रतिनिधी सुरेखा तळनकर

आचरे तयाचा धर्म या वैचारिक संग्रहास प्रथम साहित्य पुरस्कार.

माहूर प्रतिनिधी  मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिरात दि.२६ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या साहित्य मेळाव्यात आचरे तयाचा धर्म या वैचारिक संग्राहास प्रथम साहित्य पुरस्कार मिळाला आहे.पद्मश्री कुमार केतकर यांचे हस्ते लेखक अनिल कपाटे शेवाळकर यांना सदर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री चक्रधर स्वामी ग्रंथालयाचे अध्यक्ष अनिल शेवाळकर यांची यापूर्वी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आचरे तयाचा धर्म हा वैचारिक संग्रह अल्पावधीतच वाचकाच्या व समीक्षकांच्या पसंतीला उतरला असून संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राज्य पुरस्कार या संग्रहाला मिळालेले आहेत. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रदिप विचारे, दिलिप चव्हाण, दिपकरराव देशमुख या मान्यवरांची उपस्थितीत होती. अनिल शेवाळकर यांच्या साहित्यास पुरस्कार मिळाल्याबद्दल माहूर पंचायत समितीचे माजी सभापती वसंत कपाटे,सर्वज्ञ मित्र मंडळ माहूरचे जनार्दन आराध्ये,प्रताप विद्वांस,दिनेश कपाटे, विकास कपाटे,प्रवीण विद्वांस,गोविंद आराध्ये,सुरेश आराध्ये, संजय आराध्ये,राजेश आराध्ये,देवेंद्र कपाटे,अजय विद्वांस,आदर्श विद्वांस, विजय आराध्ये आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Copyright ©