यवतमाळ सामाजिक

यवतमाळात प्रथमच दिव्‍यांगासाठी फॅशन शो विदर्भातील स्पर्धक होणार सहभाग नवदिप एज्यूकेशनचा पुढाकार

यवतमाळात प्रथमच दिव्‍यांगासाठी फॅशन शो
विदर्भातील स्पर्धक होणार सहभाग  नवदिप एज्यूकेशनचा पुढाकार

यवतमाळ : जगातील दहा टक्के लोकसंख्या म्हणजे ६५ कोटी विविध अंगाने अपंग आहेत. त्याच्या उत्थानासाठी विविध अभियान आणि उपक्रम राबविण्यात येतात. दिव्‍यांगानाही समाजात मानाचे स्थान मिळावे, याच पार्श्वभूमीच्या आधारावर नवदिप एज्यूकेशनने पुढाकार घेत यवतमाळ शहरात दिव्‍यांग दिनानिमित्त प्रथमच दिव्‍यांगासाठी ४ डिसेंबर सकाळी १०.३० ते २.०० वाजेपर्यंत फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे दिव्‍यांगांतील सूप्त गुणांचा विकास होणार आहे.
राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी विशेष शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्णबधिर, मूकबधिर, अंध, शारीरिक व्यंग्यत्व, बौधिक अक्षमता, वाचादोष यांसारख्या २१ प्रकारचे अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येतो. त्यांचा विकास व्‍हावा, या उद्देशाने देशात अनेक संघटना कार्यरत आहे. दिव्‍यांगासाठी फॅशन शो यवतमाळ शहरातील एमएच २९ मॉल एसबीआय चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी मिसेस ब्युटीफुल मॉस्ट पॉप्युलर २०१८ डॉ. निकिता चव्‍हाण, मिस्टर विदर्भ मोस्ट पॉप्युलर २०१९ विक्रांत कोटक हे उपस्थित राहतील. तसेच नवदीप एज्युकेशनचे अध्यक्ष जफरभाई बॉम्बेवाला, सचिव असदभाई बॉम्बेवाला, प्रोजेक्टर डायरेक्टर तसनीम बॉम्बेवाला,उपस्थित राहणार आहे. या फॅशन शोमध्ये नागपूर, वर्धा, आर्वी, दारव्‍हा, यवतमाळ, अमरावती, अकोला येथून दिव्‍यांग स्पर्धक सहभाग होणार आहेत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व प्रथम, द्वितीय तृतीय विशेष पारितोषीक पारितोषीके देण्यात येणार आहे. स्पर्धकांचे कपड्यांचे डिझाईन केडन्स ॲकेडमी नागपूरचे संचालक झेबा असद अली यांच्या मार्गदर्शनात शिवून देण्यात येईल. नवदिपएज्यूकेशन सोसायटी द्वारे याआधीही दिव्‍यांगासाठी विशेष स्पर्धा राबविल्या आहे. यात २०१७ मध्ये दिव्‍यांगासाठी स्पर्धा , २०१८ मध्ये नृत्य व गायन, २०१९ मध्ये स्टेट लेवल योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दरवर्षी दिव्‍यांगासाठी मॅरेथॉन स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबवून दिव्‍यांगाच्या कलात्मक गुणाला वाव देण्यात नवदीप एज्युकेशनचा मोलाचा वाटा आहे. या स्पर्धेत कलाक्षेत्रातील आवड असणाऱ्या दिव्यांग युवक – युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नवदिप एज्युकेशन तर्फे करण्यात आले आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©