यवतमाळ सामाजिक

माहूर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन

 प्रतिनिधी माहूर सुरेखा तळनकर

माहूर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त दि.२८ नोव्हेंबर रोजी माहूर तालुक्यात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.त्यात वाई बाजार,लखमापुर,नखेगाव आदी गावात साजरी करण्यात आली. माहूर येथील महात्मा फुले यांच्या चौकातील फलकाचे युवासेनेचे युवानेते यश खराटे, उपनगराध्यक्ष नाना लाड,सभापती विजय कामटकर यांच्यासह बहूजन समाजतील मान्यवरांच्या हस्ते फलकाचे पुजन व हार अर्पण करण्यात आले .यावेळी अ.भा.माळी महासंघाचे महा.राज्य संघटक कार्तिक बेहेरे,माजी नगरसेवक राजाराम गंदेवाड,रुपेश कोवे,युवती सेनेच्या ता.अध्यक्षा सुरेखा तळणकर,सुरेश आराध्ये,रविद्र बेहेरे,प्रशांत शिंदे यासह अनेक बहूजन समाज बांधव व अ.भा.माळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©