यवतमाळ सामाजिक

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये सचिव कपिल चन्नावार यांच्या हस्ते खाजगी कापूस खरेदीचा शुभारंभ

 तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये सचिव कपिल चन्नावार यांच्या हस्ते खाजगी कापूस खरेदीचा शुभारंभ

 

खाजगी माहूर्ताला कापसाला ८९२५/- रुपये दर

घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. सुरेशबाबू लोणकर कापूस यार्ड मधील दि २८/११/२०२१ रोज सोमवारला कापूस खरेदीचा माहूर्ताला सुरवात करण्यात आले खाजगी कापूस व्यापाऱ्यांचा कापूस खरेदी जाहीर लिलाव द्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कपिल चन्नावार यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या शुभप्रसंगी दहेगाव येथील शेतकरी विवेक गोबाडे यांच्या बैलबंडीचे पुजन करून मोहूर्ताला सुरुवात केली. तर मुहूर्तावर कापसाला ८९२५ /- रुपये पर्यंत भाव देण्यात आला. प्रथम ५ शेतकरी बांधवांचा शेला व नारळ देऊन सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांनी मुहूर्तावर कापसाची आवक कमी होती. जवळपास १४० वाहने तर ५ बैलगाडीचा लिलाव झाला माहूर्ताला अंदाजे २००० हजार किंटल कापूस खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्री करतांना खेडा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला कापूस विक्री करू नये. शेतमालाची विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती मध्येच करावी, असे आवाहन या वेळी शेतकऱ्यांना करण्यात आले.

Copyright ©