यवतमाळ

शासकीय वस्तू संग्रहालय माहूर येथे जागतिक वारसा सप्ताह संपन्न!

 प्रतिनिधी माहूर सुरेखा तळनकर

शासकीय वस्तू संग्रहालय माहूर येथे जागतिक वारसा सप्ताह संपन्न!

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई अभिरक्षक मध्यवर्ती संग्रहालय नागपूर अंतर्गत जागतिक वारसा सप्ताह दि. १९ ते २५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत साजरा करण्यात आला. माहूर शहरातील लोकांच्या आग्रहास्तव यातील काही उपक्रम दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत चालणार असल्याचे वस्तुसंग्रहालयाचे राखणदार सय्यद आजम यांनी सांगितले.

जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने माहूर येथील प्रसिद्ध चित्रकार तथा शिक्षक रणजीत दत्त वर्मा यांच्या चित्रांचे प्रदर्शन दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत सुरू राहील. वस्तुसंग्रहालयाच्या परिसराची स्वच्छता श्री जगदंबा विद्यालय माहूर च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केली. निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा शालेय गटासाठी ची घेण्यात आली यास प्रचंड असा प्रतिसाद मिळाला तर सप्ताहाच्या समापनप्रसंगी व्याख्याते मिलिंद जाधव (कवी तथा चित्रकार नांदेड) यांचे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून अजिंठातील शिल्प व चित्र या विषयावर व्याख्यान आयोजित करून त्याची इत्यंभूत माहिती देण्यात आली हे विशेष .

सप्ताहाच्या निमित्ताने जीनियस किड्स माहूर मॉडर्न स्कूल माहूर, के. प्रा .शा .माहूर, श्री जगदंबा विद्यालय माहूर ,प्रा .शा .नवी आबादी ,प्रा .शा. भोजंती , प्रा.शा .लिंबायत, प्रा शाळा बामनगुडा या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट या उपक्रमांतर्गत भेटी देऊन विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयातील विविध शिल्प व चित्रकार वर्मा व त्यांची मुलगी गुंजन वर्मा यांच्या चित्राविषयी माहिती सांगून त्यांच्या ज्ञानात भर पाडली , सप्ताहाच्या काळात वस्तू संग्रहालय विनामूल्य ठेवण्यात आले होते.

जया वाहने ,अभिरक्षक ,नागपूर विनायक निटुरकर ,उपअभिरक्षक, नागपूर यांनी सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले, तर राखणदार सय्यद आजम, विक्रांत चिपडे ,मंगेश चांदुरकर, सेवानिवृत्त राखणदार राम कोंडे, साबळे साहेब, जितेंद्र वर्मा, अजय पोपुलवार, मिलिंद कंधारे, शेषराव पाटील ,संजय खडकेकर बालाजी कोंडे,मॉडर्न स्कूलचे संचालक अजिज सर ,व जीनियस किड्स स्कूलचे संचालक भाग्यवान भवरे , विक्रांत चव्हाण यांनी प्रत्येक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह हजेरी लावून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©