यवतमाळ सामाजिक

जातीतून प्रवर्गाची लढाई लढण्याकरता महात्मा फुले यांचे विचारधारा सर्वात महत्त्वाची : प्रा. सुदाम चिंचाने

जातीतून प्रवर्गाची लढाई लढण्याकरता महात्मा फुले यांचे विचारधारा सर्वात महत्त्वाची : प्रा. सुदाम चिंचाने

यवतमाळ: सामाजिक क्रांतीचे पितामह महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस महात्मा फुले यांचा पुतळा या ठिकाणी संपन्न झाला.
याप्रसंगी औरंगाबाद येथील प्रा. सुदाम चिंचाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .सकाळच्या सत्रात बोलताना ते म्हणाले की महात्मा फुले यांची विचारधारा ही जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला सातत्याने कार्य करावे लागेल. जातीच्या प्रक्रियेतून बाहेर निघून आपल्याला प्रवर्गाची लढाई, म्हणजे ओबीसी ची लढाई लढावी लागेल. याच प्रसंगी बोलताना डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी महात्मा फुले ची जीवन कार्य प्रणाली आपण स्वीकारली तरच आपलं अस्तित्व राहील, अन्यथा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे असे सागितले.तरी येणारी सदी 21वी सदी ही फुले शाहू आंबेडकर विचारधारांचीच राहील असे मत त्यांनी मांडले . विलास काळे बोलताना म्हणाले आज या ठिकाणी माळी समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला, परंतु महात्मा फुले यांनी जी संघटना बांधली ती संघटना न्हावी समाजाची संघटना होती. केशव्यपन करणाऱ्या प्रवृत्तीला नाकारण्याचा काम न्हावी समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलं .आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून समतेचा बीज त्यांनी पेरली. याप्रसंगी वेगवेगळ्या वत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारा जनमानसापर्यंत पोहोचवण्याची शपथ सुद्धा याप्रसंगी घेतली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही अभिवादन करण्यात आलं .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आलं .आणि ज्योती सावित्री वंदना करून सदर कार्यक्रमाची समाप्ती झाली . याप्रसंगी प्रवक्ता प्रा.डॉ.बाळकृष्ण सरकटे, माळी महासंघाचे अध्यक्ष अरुण तिखे वसंत नाल्हे. महिला आघाडीचे अध्यक्ष माधवी चिंचोळकर.प्रा.काशिनाथ लाहोरे, इंजी.अशोकराव तिखे,रवी नागरीकर .अड अरुण मेहत्रे .विठ्ठलराव नागतोडे. संजय यवतकर, ज्ञानेश्वर रायमल ,मायाताई गोरे . प्रा सविताताई हजारे. ज्योतीताई निरपासे. माधुरी नाले. शुभांगी मालखेडे,मोहन लोखंडे .नरेंद्र परोपटे. विवेक गावडे .डॉ. दिलीप घावडे,संयम दिलीप घावडे ,रामदास गावडे, सुनील कडू ,ज्ञानेश्वर गायकवाड, पुंडलिक रेकलवांर,भानुदास केळझरकर , डॉ. विनोद डवले.विवेक वानखडे, ज्ञानेश्वर वानखडे, विनायक वानखेडे, मनीषा तिरनकर ,अशोक वानखेडे, सिद्धार्थ भवरे, प्रमोदिनी रामटेके, नारायण स्थूल, प्रा.अंकुश वाकडे ,,दीपक नगराले ,जनार्दन मनवर, नामदेव स्थूल सुनीता काळे प्रिया अंकुश वाकडे, नीता दरणे ,सिंधुताई धवणे, शोभना कोटंबे, सचिन साखरकर ,पुंडलिक. रेकलवांर ,शशिकांत फेडर, मनोज रणखांब, कुंदा तोडकर मडावी ,इंजी. सुरेश मडावी, विजय मालखेडे, आदी बांधव उपस्थित होते.

Copyright ©