यवतमाळ सामाजिक

क्रांतीवीर शामादादा कोलाम जयंती उत्साहात साजरी.

क्रांतीवीर शामादादा कोलाम
जयंती उत्साहात साजरी.

सावळी सदोबा पासून जवळच असलेल्या बेलोरा ( वन ) या गावात प्रथमच क्रांतीवीर , राॅबीनहुड श्यामादादा कोलाम यांची 123 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शामादादा कोलाम संघटना बेलोरा यांच्यावतीने आयोजित या जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. नुनेश्वर आडे तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर , विरपत्नी श्रीमती कुंतीताई ज्ञानेश्वर आडे , शामादादा कोलाम संघटनेचे जिल्हा सदस्य श्री. सदाशिव सयाम , आर्णी तालुका अध्यक्ष श्री. विठ्ठल कसारे , तालुका समिती सदस्य श्री.मनोहर मेश्राम, संजय मेश्राम , तालुका सचिव श्री. शंकर कुंभेकर , संतोष गाडेकर , किसन नाईक चव्हाण,आकाश राठोड, अविनाश शिंदे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीवीर , राॅबीनहुड शामादादा‌ कोलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शहीद ज्ञानेश्वर आडे यांच्या विरपत्नी श्रीमती कुंतीताई आडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शामादादा‌ कोलाम यांच्या जयंती च्या निमित्ताने गावातील मुख्य रस्ते रांगोळी काढून सजविण्यात आले होते.
शामादादा‌ कोलाम यांची जयंती प्रथमच बेलोरा ( वन ) येथे साजरी करन्यात आल्याबद्दल नुनेश्वर आडे व मुबारक तंवर यांनी संघटनेचे युवा कार्यकर्ते तथा मुख्य आयोजक श्री. पुंडलिक मेश्राम यांचा यावेळी सत्कार केला.
शामादादा‌ कोलाम संघटनेचे दिनकर राजूरकर, विलास शिंदे, अरविंद मेश्राम, संजय तलवारे, गुरुदेव मेश्राम, प्रवीण शिंदे, गणपत आत्राम, रामेश्वर आत्राम , ऋषभ आत्राम, अरविंद शिंदे, सौ. मीराबाई दत्ता आत्राम , सौ.अनुसया विलास शिंदे , सौ. वनमाला उत्तम तलवारे, रामजी नागोराव मेश्राम इत्यादी मंडळींनी शामादादा कोलाम जयंती उत्साह पार पाडण्याकरीता अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमास गावातील महिला, पुरूष म़डळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©