यवतमाळ सामाजिक

वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी पांडुरंग निकोडे यांची निवड

 तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी पांडुरंग निकोडे यांची निवड 

घाटंजी: भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या देशातील बहुजन समाज हा सामाजिक, आर्थिक शैक्षणिक व राजकीय सत्तेपासून वंचीत आहे. अशा सर्व बारा बलुतेदार समाज घटकाला एकत्र करून या महाराष्ट्र बहुजन हृदय सम्राट मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. संपूर्ण महाराष्ट्र लोकसभा विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समीती व ग्रामपंचायत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी निवडणुका लढविणार आहे. याच संदर्भात 24 नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई येथे राज्यातील तालुका अध्यक्षांची सभा झाली, यावेळी महाराष्ट्र माळी मिशन चे चंद्रपूर लोकसभा समन्वयक पांडुरंग निकोडे यांची बाळासाहेबांच्या हातून यवतमाल जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, घाटंजी तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे उपस्थित होते. यापुढे शेतकरी व वंचित घटकातील बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी जि पक्षाने जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पाडू असा विश्वास पांडूरंग निकोडे यांनी बोलून दाखविला अशी माहिती घाटंजी तालुका महासचिव नितीन राठोड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे.

Copyright ©