यवतमाळ सामाजिक

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली!

 प्रतिनिधी माहूर सुरेखा तळणकर

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली!

२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच त्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक २६ शनिवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण
करण्यात आली.

मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दरवर्षी” शहीदो को सलाम” हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.जो शहीद हुए है उनकी, जरा यॉंद करो कुर्बानी… या गीताप्रमाणे मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यास १४ वर्षं पूर्ण झाली आहेत.या भ्याड हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांना माहूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक नामदेव रिठ्ठे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप,ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान,मेघराज जाधव, प्रा.भगवान जोगदंड,शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,सभापती अशोक खडसे,नगरसेवक प्रतिनिधी रणधीर पाटील,रफिक सौदागर, अप्सर आली,इरफान सैय्यद,रहमत आली,लतिफ शेख,गजानन कुलकर्णी,सुरेखा तळणकर,पद्मा गीऱ्हे,दिनेश कोंडे,विकास राठोड,निलेश जाधव,सचिन वाघमारे,इम्रान सुरय्या,राष्ट्रवादी चे शहर प्रमुख अमित येवतिकर यांच्या सह अनेक नागरिकांनी उपस्थिती होती.सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त करताना, २६/११ च्या मुंबई हल्याप्रसंगी उद्भवलेली कठीण परिस्थिती व त्यानंतर आपल्या वीर जवानांनी दाखविलेले अफाट शौर्य, साहस संपूर्ण जगाने पाहिले आहे. म्हणून आज आपण सर्व शहिदांना सलाम करतो, असे सांगितले. यावेळी उपस्थितांनी हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन व दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.संचलन हाजी कादर दोसानी यांनी प्रास्ताविक नंदू कुमार संतान यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Copyright ©