यवतमाळ राजकीय

जलदुतांनी सोडवला ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या योजनेचे काम पूर्ण

जलदुतांनी सोडवला ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न
शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या योजनेचे काम पूर्ण

भोयर येथील ग्रामस्थ जवळपास 25 दिवसापासून पाण्यापासून वंचित होते. त्याचे कारण असे की गावाला ज्या विहिरीपासून पाणी मिळायचे त्या विहिरीचे पाणी येथील व्यवसायिक एमआयडीसीच्या बांधकामासाठी वापरत आहेत एमआयडीसीतील बांधकामामुळे विहिरीची पाईपलाईन बंद झाली आहे त्यामुळे गावकऱ्यांना पाणी मिळत नाहीये. ग्रामपंचायतने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी पाठपुरावा केला असता अजूनही कोणतीही उपयोजना त्यांनी केली नाही.

या व्यतिरिक्त 2017 ला गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन योजना मंजूर झाली होती. विहिरीचे आणि टाकीचे काम सुद्धा पूर्ण झाले होते पण ग्रामपंचायतच्या दुर्लक्षपणामुळे पाईपलाईनचे काम अजूनही पूर्ण झाले नव्हते. या योजनेचे काम आतापर्यंत अपूर्ण आहे ही माहिती जलदूत म्हणून ओळख असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांना मिळताच त्यांनी त्या विहिरीच्या आणि टाकीच्या कामाचा पाठपुरावा केला आणि त्याच्या पाईपलाईनचे काम युद्ध पातळीवर सुरू करायला लावले आणि येत्या दोन दिवसात गावाला मुबलक असे पाणी मिळेल असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. आज गावकऱ्यांना पाणी सुद्धा मिळाले आणि त्यांनी गावात आनंद साजरा केला. यावेळी इथे रवि चव्हाण, मनोज मेश्राम, विश्वनाथ गोच्चे, पंकज सोळंकी, नरेश गौरकार, गजानन नेवारे, गजानन शेंद्रे, पंजाबराव एलनकार, भास्कर पेंदोर, सदानंद पेंदोर, सोनाली सहारे संगीता आंबेकर, मीनाताई गौरकार, रंजनाताई सकारापुरे, यशोदाबाई लुंगशे, आशाबाई मुंडेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Copyright ©