Breaking News यवतमाळ

त्या अपघात ग्रस्त दोन्ही महिलेचा रुग्णालयात मृत्यू

 प्रतिनिधी प्रवीण बोरकर

त्या अपघात ग्रस्त दोन्ही महिलेचा रुग्णालयात मृत्यू

यवतमाळ धामणगाव रोडवरील अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान दोघींच्याही मृत्यु झाला.
सवी. असे की १७ नोव्हेंबर ला सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास जेवण करून खप्ती मंदिर परिसरात फिरायला आल्या असता अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यात पूजा विलास कुलभेवार वय २१, कल्पना संजय कुलभेवार वय ४१ ह्या गंभीर जख्मी झाल्याने वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ येथे दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले येथे उपचार सुरू असताना २१ नोव्हेंबर ला सायंकाळी ६ डॉ.नी मृत घोषित केले तर कल्पना संजय कुलमेवार हीचा रात्री एक वाजता मृत्यू झाल्याने सर्वत्र हळ हळ वेक्त करण्यात येत आहे त्या अज्ञात वाहनाच्या अजूनही शोध लागला नाही विशेष या परिसरातील सी सी टीव्ही क्यानेरे बंद असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान झाले आहे,या परिसरात सी सी टीव्ही क्यामेरे बसुवून सर्व सामान्यांच्या संरक्षण करावे व मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Copyright ©