यवतमाळ सामाजिक

रत्नशील,सम्यक राष्ट्रीय संघात

रत्नशील,सम्यक राष्ट्रीय संघात

औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांनी महाराष्ट्राच्या संघ निवड चाचणीचे आयोजन १८/११/२०२२ रोजी केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील शंभर च्या वर खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये यवतमाळच्या रत्नशिल विनोद डोंगरे व सम्यक सुरेंद्र गजभिये या दोघांनीही निवड चाचणी दिली.अतिशय उच्च दर्जाची पिचिंग कौशल्यात माहिर असलेला रत्नशील हा पिचिंग मध्ये तर त्यालाच तोलामोलाची साथ देणारा सम्यक हा कॅचिंगमध्ये आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्याच्या गौरवात मानाचा तुरा खोवला गेला. रत्नशील व सम्यक हे दोघेही जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय च्या सॉफ्टबॉल प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतात.कोरोना काळात सर्व जग ठप्प असताना त्यांनी सलग दोन वर्षे कसून सराव केला. याचीच फलित म्हणून आंध्र प्रदेश कर्नुल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात त्यांची निवड झाली. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय आई-वडील,राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, यवतमाळ जिल्हा साॅफ्टबाॅल असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. विकास टोणे, वरिष्ठ मार्गदर्शक पंकज शेलोटकर,स्वप्निल चांदेकर, पियुष चांदेकर तसेच भाकीत मेश्राम यांना देतात.

Copyright ©